जालना- मराठवाड्यातील द्राक्ष उत्पादक, शेततळ्याचे गाव म्हणून ओळखले जात असलेले कडवंची हे गाव जलसंधारणातून आर्थिक समृद्ध झाले असून एकटे गाव ६० कोटी रुपयांचे द्राक्ष उत्पादन घेत असून गावाचे दरडोई उत्पन्न पावणे दोन लाख रुपयांच्या घरात आहे. जालना तालुक्यातील कडवंची हे गाव जालना- सिंदखेडराजा महामार्गावर आहे, नव्याने झालेला समृद्धी महामार्ग याच गावातून जातो. पाण्याचे दुर्भिक्ष असलेले हे गाव कधीकाळी पाण्यासाठी टाहो फोडत असे. अडीच दशकापूर्वी नाबार्ड पुरस्कृत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या मृदसंधारण व जलसंधारणाच्या यशस्वी कामानंतर हे गाव आता नावारूपाला आले आहे.
कडवंची गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे १८८८ हेक्टर एवढे आहे. गावाची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात तर कुटुंब संख्या ३६०. गावाचे चे वार्षिक पर्जन्यमान ६८५ मिलीमीटर. १९९६ मध्ये गावात २०६ विहीरी होत्या, पावसाचे प्रमाण कमी – अधिक होत असल्याने उन्हाळ्यापूर्वीच विहिरी तळ गाठायच्या, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांनी पुढाकार घेत कडवंची येथे पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेण्यात आली. विजयअण्णा बोराडे यांनी तसेच मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ मंडळींनी गावात मृदसंधारण व जलसंधारण कामाबाबत जनजागृती केली. या कामाला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला.
कडचंची येथे पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची काम करीत असतांना नाबार्डने १कोटी ७ लक्ष रुपये कामासाठी दिले तर प्रकल्प चालू असताना कडवंचीच्या शेतक-यांनी १४ लाख रुपयांचे कामामध्ये श्रमदान व सहभाग केले त्यापैकी ५०टक्के म्हणजेच ६ लक्ष ९० हजार रुपये कडवंचीच्या पाणलोटासाठी देखभाल निधी म्हणून नाबार्डने दिला. गावातील पाणलोट क्षेत्रातील ४०८ हेक्टरमध्ये सीसीटी व बनीकरण करण्यात आले आहे. १२९८ दगडी पाळी, १४०८ हेक्टरमध्ये बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. बांधाची लांबी ही प्रति हेक्टरी ३०० मीटर एवढी आहे. पाईप सांडव्यांची संख्या ३२९८ एवढी आहे. गावात जलसंधारणतून १९ सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले असून ५०३ शेततळे निर्माण झाले आहेत. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत कडवंची येथे अंतर्गत शेततळे, ठिबक संच योजना, फळबाग लागवड, अंतर्गत शेडनेटची उभारणी आदी कामे पूर्ण झाली आहेत.
कडवंचीचा कायापालटः पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी १९९६ मध्ये कडवंचीमध्ये १३३६ हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली होते, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाल्यानंतर अडीच दशकात १५१७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ओलिताखालील ल क्षेत्र हे आता ११ टक्के एवढे झाले आहे. १९९६ मध्ये कडवंचीमध्ये १४७ हेक्टर क्षेत्र हे पडीक होते, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झाल्यानंवर ते क्षेत्र ६२ हेक्टरवर आले आहे. १९९६ मध्ये बारमाही सिंचन क्षेत्र हे १७४ हेक्टर होते ते पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाल्यानंतर ६१७ हेक्टर झाले आहे. द्वार सिंचन क्षेत्र हे १९९६ मध्ये ३९८ हेक्टर होते ते आता ९८७ हेक्टर झाले आहे. १९९६ मध्ये गावात २०६ विहिरी होत्या त्यांची संख्या आता ३९८ एवहीं झाली आहे. १९९६ मध्ये गावात एकही शेततळे नव्हते आता ५०३ शेततळे झाले आहेत. १९९६ मध्ये कडवंचीमधील भूजल पातळी ही ६.०३ मीटर एवढी होती ती पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाल्यानंतर ११.९७ मीटर एवढी झाली आहे.
एकंदरीत जलसंधारणाच्या कामातून विकसित्त झालेले कडवंची हे गाव आज आर्थिक समृद्ध झाले आहे. कृषी तंत्र मंडळाचे मार्गदर्शन सल्ला ऐकल्याने शिवाय गाव समृद्ध करण्याची सामुदायिक मानसिकता निर्माण झाल्याने आज कडवंची द्राक्षाचे तसेच शेततळ्याचे गाव म्हणून ओळखले जात आहे. आज द्राक्ष उत्पादन व भाजीपाला उत्पादनातून वर्षाला बक्कळ कमाई करणारे शिवाय शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या कडवंची गावातील सिंचनाचा प्रश्न सुटला आज सुटला असला तरी भविष्यात शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही, बाचे नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
आर्थिक समृद्ध कडवंची
– जलसंधारणातून कायापालट झालेल्या कडवंची आता आर्थिक समृद्ध झाली आहे. द्राक्ष उत्पादक गाव म्हणून कडवंची गावाची मराठवाड्यात ओळख झाली आहे. १९९६ मध्ये गावात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होण्यापूर्वी कडवंची येथे केवळ ३ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जात होते, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाल्यानंतर आता जवळपास ६०० हेक्टर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन होत आहे, भाजीपाला उत्पादन क्षेत्र हे १०५ हेक्टरच्या पुढे गेले आहे.
– द्राक्ष उत्पादनातून कडवंची येथील शेतकरी वर्षाला ६० कोटी रुपये कमवत असून भाजीपाला व इतर पीक उत्पादनातूनही चांगला नफा कमवत आहेत. पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होण्यापूर्वी कडवंची येथील कृषी उत्पादन वर्षाला ७७ लाख रुपये एवढे होते तर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाल्यानंतर ते आता ७० कोटी ७७ लाख रुपये एवढे झाले आहे. कडवंची येथील शेतकऱ्याचे दरडोई उत्पन्न हे १९९६ मध्ये ३२६४ रुपये एवढे होते तर आता ते पावणे दोन लाख रुपये एयडे झाले आहे. द्राक्ष उत्पादन व भाजीपाला व्यवसायाशी निगडित असलेल्या मजुरांना आज मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.











Mauris mattis auctor cursus. Phasellus tellus tellus, imperdiet ut imperdiet eu, iaculis a sem. Donec vehicula luctus nunc in laoreet.