स्टील आणि सीड्स हब म्हणून जालन्याची ओळख निर्माण झालेली आहे. जालना हा एक प्राचीन जिल्हा असून, जालना जिल्ह्याचा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला. पुढील काळात हा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होता. दिनांक १ मे, १९८२ रोजी औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांची पुनर्रचना करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले यांच्या योदानामुळे जिल्ह्याला सीड्स हब म्हणून ओळख मिळाली आहे. स्टील हब म्हणून जालना जिल्हा देशात नव्हे तर जगात पोहचले आहे. देशाच्या राजकारणात महत्वाच्या व्यक्तीला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असल्याने राज्यातील पहिला ड्रायपोर्ट, रेल्वे आधुनिकिरण, आयसीटी महाविद्यालय, एमआयडीसी, रेशीम विकास केंद्रास मान्यता, सीड्स पार्कला मंजुरी मिळाल्याने महत्वपूर्ण प्रकल्प जिल्ह्यात सुरु झाले आहे. एकीकडे विकासाची गंगा वाहत असली तरी दुसरीकडे मात्र दुष्काळग्रस्त जालना, शैक्षणिक मागासलेपणा, अपुरे जलस्रोत, बेरोजगारी,आरक्षण विषयामुळे जालना केंद्रस्थानी राहिलेला आहे.
जालना हे शहर बी-बियाणांच्या उत्पादनासाठी व व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
अंबड या ठिकाणी मत्सोदरी नामक लेणे मंदिर आहे. अंबा ऋषींनी या मंदिराचे निर्माण केले, अशी कथा आहे.
अंबड तालुक्यातील गोंदी येथे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नोते स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म झाला.
जालना जिल्ह्यातील जांब हे ठिकाण समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे.
जालना जिल्ह्यातील दावलवाडी येथे महिको ही संकरित बियाणे उत्पादन करणारी कंपनी आहे.
जालना जिल्ह्यातील इंदेवाडी या गावात आंतरराष्ट्रीय उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र (इंटरनॅशनल सॅटेलाइट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन) उभारण्यात आले आहे.
हेमाडपंती शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे मंठा तालुक्यातील हेलस हे गाव असून, हे ठिकाण प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
जालना जिल्ह्यात धाडसी लमाणी व भिल्ल जमाती आहेत.
जालना जिल्ह्यातील मंठा हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील गुरांचा बाजार प्रसिद्ध आहे.
भारतातील एकमेव जांबुवंताचे मंदिर जांबुवंतगड येथे आहे.
गुरू गणेश तपोधाम– जैन धर्मियांसाठीचे हे एक पवित्र ठिकाण म्हणून ओळखले जाते. गुरु गणेश तपोधाम याला कर्नाटक केसरी म्हणूनदेखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्टमार्फत या धार्मिक स्थळाची देखरेख व निगा राखली जाते. या ट्रस्टमार्फत शालेय संस्थान, महाविद्यालय, अंधांची शाळा, ग्रंथालय, गोशाला चालविल्या जातात. संस्थानची गोशाला ही मराठवाड्यातील सर्वात मोठी गोशाला आहे.
जालना जिल्हा संक्षिप्त माहिती
१. भौगोलिक माहिती : जालना जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस परभणी जिल्हा असून, ईशान्येस बुलडाणा जिल्हा, दक्षिणेस बीड, पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा व नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या वायव्येकडील भाग अजिंठ्याच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे.
२. नद्या व धरणे : गोदावरी, पूर्णा व दुधना या जालना जिल्ह्याच्या महत्त्वाच्या नद्या असून, गिरजा, खेळणा, जीवरेखा, धामणा, दुधना, कल्याण या उपनद्या आहेत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा, अंबड तालुक्यातील गल्हाटी, भोकरदान तालुक्यातील जुई व धामना, जालना तालुक्यातील कल्याण,पीरकल्याण ही जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत.











Mauris mattis auctor cursus. Phasellus tellus tellus, imperdiet ut imperdiet eu, iaculis a sem. Donec vehicula luctus nunc in laoreet.